श्रीगोंदा तालुक्यात बर्ड फ्लु…… ? नागरिकांमध्ये दहशत

0 22

  श्रीगोंदा  –   श्रीगोंदा शहरातील एका शाळेसमोरील कॉम्प्लेक्स मध्ये आज सकाळी पारवा(कबुतर) मयत अवस्थेत आढळुन आले. यामुळे भयभीत झालेले रहिवासी व त्यांचे लहान मुले यांनी दक्ष नागरिक फाऊंडेशनशी संपर्क केला. दक्षचे अध्यक्ष दत्ताजी जगताप व संचालक श्रीरंग साळवे यांनी घटनास्थळी धाव घेऊन सबंधीत वन विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता ते सुट्टीवर असल्याचे समजले. अधिकार्यांनी कर्मचार्याचा मोबाईल नंबर दिला. दक्षने त्यांच्याशी संपर्क केला परंतु ते सुध्दा कार्यालयीन कामासाठी अहमदनगरमध्ये असल्याचे समजले.

  महिलेशी डेटिंग अ‍ॅपवर झाली ओळख, लग्नाचा आमिष दाखवून आरोपीने केला बलात्कार

मग पुढे आणखी फोन करुन कर्मचारी बोलावुन घेऊन सर्व हकीगत सांगितली. ते मयत कबुतर पशु वैद्यकिय अधिकारी श्रीगोंदा यांचेकडे तपासणी साठी घेऊन गेले असता ते कबुतर अहमदनगर येथून उत्तरीय तपासणीसाठी पाठवत आहोत असे सांगितले. हे नक्कीच बर्ड फ्लुने मेले नसावे असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकिय अधिकार्यांनी बोलवुन दाखविला.

                  हे पण वाचा –  ११०० पोलीस ठाणे आता बाळ बोठेच्या मागावर | 

Related Posts
1 of 1,290

कारण अजुन आपल्याकडे असा पक्ष्यांचा कोणताही आजार आला नसल्याचे ते म्हणाले. कदाचित यापुढे जास्त संख्येने पाण्याच्या ठिकाणी पक्षी मयत अवस्थेत आढळुन आले तर मात्र बर्ड फ्लु या आजाराच्या दिशेने कामकाज करावे लागेल असे त्यांनी सांगितले. तरी सुध्दा नागरिकांनी काळजी घ्यावी व घाबरुन जाऊ नये असे ही सुचित केले. या एकुण घटनेमध्ये सुनिल मुनोत, दक्षचे अध्यक्ष दत्ताजी जगताप, श्रीरंग साळवे, गणेश भोस, वन रक्षक नितीन डफडे, वन मजुर प्रकाश अवचर यांनी सहकार्य केले.

              अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांना मँट कोर्टाचा मोठा दिलासा

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: