श्रीगोंदा तालुक्यात कोविड लसीकरणाला सुरुवात

0 28
श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात कोविड 19 (कोरोना) लसीकरण सेंटरचे उदघाटन आ.बबनराव पाचपुते, व तहसीलदार प्रदीप पवार यांच्या हस्ते करण्यात येऊन लसीकरणाची सुरुवात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन खामकर यांना लस टोचून करण्यात आली.
   सोमवार दि.25 रोजी सकाळी 10 वा सुमारास नगर श्रीगोंदा विधानसभेचे आमदार बबनराव पाचपुते तसेच श्रीगोंदयाचे तहसीलदार प्रदीप पवार  यांच्या हस्ते श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात कोविड 19 (कोरोना) लसीकरण सेंटरचे उदघाटन करण्यात आले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन खामकर याना प्रथम कोविशिल्ड लस देण्यात येऊन लसीकरणाची सुरुवात करण्यात आली.
Related Posts
1 of 1,290
यावेळी गटविकास अधिकारी प्रशांत काळे डॉ राजुळे, डॉ नवीन यादव, डॉ थोरात, आरोग्य सेवक व कर्मचारी,उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे,मा उपनगराध्यक्ष अशोक खेंडके, नगरसेवक सुनील वाळके, संग्राम घोडके, जयश्री कोथिंबीरे यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: