श्रीगोंदा तालुक्यातील ५९ ग्रामपंचायत निवडणुकीत २१२० अर्ज वैध

0 23
श्रीगोंदा –  श्रीगोंदा तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर होऊन ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी ५९ गावांच्या ग्रामपंचायत उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास दि. २३ डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे. नामनिर्देशन पत्र भरण्याचा अंतिम दिनांक ३० डिसेंबर पर्यंत असल्याने  एकूण २१६३ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरले. दि.४ रोजी अर्ज माघारी व निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले.  एकमेव ढवळगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. तर ७१ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीच्या निवडणुक प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी राज्यभरात एकच गर्दी केली त्यामुळे ऑनलाइन प्रक्रिया ठप्प झाल्याने निवडणूक विभागाने ऑफलाइन अर्ज स्वीकारले.
Related Posts
1 of 1,291

                      ग्रामपंचायत निवडणूक –  १४ गावात विखे विरुद्ध थोरात यांच्यात थेट लढत  

एकूण २१६६ उमेदवारांनी अर्ज भरले होते. ऑनलाइन  १६२० उमेदवारांनी अर्ज भरले होते तर ऑफलाईन ५२६उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते.३१ डिसेंबर रोजी अर्जांच्या छाननीअंती २१२० नामनिर्देशन पत्र वैध झाले आहेत. ४६ नामनिर्देशन पत्र अवैध झाले आहेत.सोमवार दि.४ रोजी अर्ज माघार दिवशी तब्बल ९५३ उमेदवारांनी अर्ज माघे घेतले. त्यामुळे प्रत्यक्ष रिंगणात १०९६ उमेदवारांच्यात लढती होणार आहेत. तर तालुक्यातील एकमेव ढवळगाव  ग्रामपंचायत बिनविरोध ठरली आहे.तर ५९ ग्रामपंचायतीतील ७१ उमेदवारांची बिनविरोधनिवड झाली आहे. उमेदवार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना चिन्हे वाटप करण्यात आली. दि.१५ रोजी सकाळी ७:३० ते सायं. ५:३० पर्यंत प्रत्यक्ष मतदान होणार आहे. मतमोजणी दि.१८ रोजी होऊन भावी कारभारी ठरणार आहे.

                     कोण होणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, आज घोषणा होण्याची शक्यता

चौकशी- अर्ज माघारी दिवशी गावोगावचे उमेदवार व समर्थक मोठ्या प्रमाणावर आल्याने श्रीगोंदा येथील नगरपालिकेच्या सांस्कृतिक सभागृहाला जत्रेचे स्वरूप आले. निवडणूक विभागाचा भोंगळ कारभार परत एकदा समोर आला. प्रत्येक गावासाठी एक टेबल होते परंतु त्या टेबलापुढे अभूतपूर्व गर्दीचे कोंडाळे दिसून आले. अर्ज माघारी व चिन्हांचे वाटप अतिशय संथगतीने चालू होते.

              हे पण पहा – बाळ बोठे घेतोय गुन्ह्यातून सुटण्यासाठी तांत्रिकाची मदत

सोमवारी रात्री उशिरापर्यंत निवडणूक विभागाचा घोळ चालू होता. प्रशासनाने कोरोना काळ असूनही सामाजिक अंतर राखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला होता. गावोगावच्या समर्थकांचे जथ्थे चार चाकी गाड्यांमधून आल्याने पार्किंगचा बोजवारा उडाला होता.शनी चौकात दिवसभर ट्रॅफिक जाम होते. दिवसभर आकाश भरून आले व रिमझिम पावसाने गर्दीची तारांबळ उडाली होती. अर्ज माघार घेण्यासाठी नेत्यांची काही उमेदवारांनी चांगलीच गंमत केली. रुसवे फुगवे, मनधरणी, दमदाटी, एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान सगळे प्रकार पाहायला मिळाले. आमदार बबनराव पाचपुते यांनी बिनविरोध निवड होणाऱ्या ग्रामपंचायतीला १० लाखांचा निधी जाहीर करूनही फक्त एकमेव ढवळगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली. तर ७१ जागेंवर प्रतिस्पर्ध्यानी अर्ज माघारी घेतल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.दि.१५ रोजी मतदानापर्यंत साम-दाम-दंड-भेद सगळे प्रकार अनुभवायला मिळणार आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: