श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील श्री कोळाईदेवी विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिननिमित्त शिक्षक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला

शिक्षक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला

0 9

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील श्री कोळाईदेवी विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिननिमित्त शिक्षक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे उपमुख्याध्यापक जंगले होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित लगड होते .
तर इयत्ता १० वी तील विद्यार्थीनी कु.रामेश्वरी लगड हिने मुख्याध्यापिका, चि.रोहन अडागळे उपमुख्याध्यापक, कु. घोंडगे सानिका पर्यवेक्षिका होत यांनी संपुर्ण दिवस पदभार स्विकारत शाळेचा कारभार सांभाळला होता. तसेच इतर विद्यार्थ्यांनी शिक्षक बनुन दिवसभर शिक्षकांच्या कामाचा अनुभव घेतला . विद्यार्थी भाषणात कु .राजनंदिनी खोमणे, कु.सृष्टी शिंदे, चि. रोहन साके यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
प्रमुख पाहुणे अमितदादा लगड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की , एक संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी शाळाच एक सक्षम माध्यम आहे .विद्यार्थ्यांनी सतत नव्याचा ध्यास घ्यायला हवा व उत्तम गुणांचे संपादन करायला हवे असे प्रतिपादन केले .अध्यक्षीय भाषणात शाळेचे उपमुख्याध्यापक जंगले यांनी शिक्षक दिनाचे महात्म्य व शिक्षकांचे जीवनातील स्थान याचे महत्त्व समजावुन सांगितले. यानंतर इयत्ता दहावीची विद्यार्थिनी शिक्षिका कु.रोशनी टुले हीने उपस्थित सर्वांचे आभार मानले .तर संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यार्थीनी कु. अनुष्का राहुल चंदन हिने केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी 10 वी वर्गशिक्षक काळे एस.यु, सौ.सब्बन, सौ.देशमुख तसेच केकाण , सौ.शिंदे , काळे एस.आर व सर्व शिक्षक -शिक्षकेतर वृंद यांचे सहकार्य लाभले . संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रम राबवत उत्साह पुर्ण वातावरणात शिक्षक दिन कार्यक्रम संपन्न झाला .

Related Posts
1 of 165
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: