शेवगाव तालुक्यात घराच छत कासळून एकाचा मृत्यू

0 159

शेवगाव- जिल्हयात चालू असलेला मुसळधार पावसामुळे शेवगाव तालुक्यातील आखेगाव या ठिकाणी घराचे छत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली या घटनेत नानाभाऊ शंकर कोल्हे (वय ७९) यांचा मृत्यू झाला आहे.


घर कोसळल्याचा आवाज होताच जवळपास राहणाऱ्या लोकांनी परिस्थिती पाहून बचावकार्य सुरू केले. दरम्यान पोलीस पाटलांनी या घटनेची खबर शेवगाव पोलिसांना देताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. गावातील लोकांनी खोरे, फावडेच्या साहाय्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नानाभाऊंना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते परंतू लाकडी खांड, माती जास्त असल्याने जेसीबी यंत्राच्या साहाय्याने ढिगारा हटवावा लागला.

Related Posts
1 of 2,052

नानाभाऊ कोल्हे यांच्या पत्नी कौसाबाई व सून सीताबाई या शेळ्याबांधण्यासाठी बाहेर गेल्याने त्या दोघी सुरक्षित आहेत. गेल्या दोन दिवस पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने खणाच्या घराचे माळवद कोसळल्याचे ही घटना घडली असे तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: