शेतकऱ्यावर लाठीचार्ज नंतर दिल्लीला छावणीचे स्वरूप

0 27

नवी दिल्ली-  देशाच्या राजधानी मध्ये मागच्या दोन महिन्यापासून केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणारे शेतकरी संघटनेने आज दिनांक २६ जनवरी रोजी देशाच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्राने लागू केलेल्या कृषी कायद्याविरुद्ध भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केला होता.

या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान नवी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर दिल्लीत तणाव निर्माण झाला आहे. आयटी येथे शेतकऱ्यांनी पोलिसांची व्हॅन, क्रेन ताब्यात घेतली आहे. त्यामुळे पोलीस या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार करत आहे. शेतकरी आंदोलन अधिकच चिघळल्याने दिल्लीतील मेट्रोही बंद करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. शेतकरी लाल किल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवल्याने संपूर्ण दिल्लीला छावणीचं स्वरुप आलं आहे.

पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली काढण्यासाठी दुपारी १२ वाजेची वेळ दिली होती.

Related Posts
1 of 1,291

पण संयुक्त शेतकरी मोर्चाच्या नेत्यांचं न ऐकता शेतकऱ्यांनी ही रॅली काढली. तसेच शेतकऱ्यांना रॅलीसाठी जो मार्ग आखून दिला होता. त्या मार्गावरून शेतकऱ्यांनी रॅली काढली नाही. शेतकऱ्यांनी वेगळ्याच मार्गाने रॅली काढली होती. सिंधु बॉर्डरवरून ही रॅली निघणार होती. मात्र, या मार्गाने न जाता शेतकरी आयटीओपर्यंत पोहोचले. त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवल्याने पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. त्यातच दगडफेक सुरू झाल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. याचवेळी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्यास सुरुवात केली.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: