शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण :राजपथावर ट्रॅक्टर दिला पेटवून !

0 39

देशात आरक्षणाच्या मुद्द्यासाठी मराठा , धनगर समाजाने आंदोलनाला सुरुवात केली आहेत.तसेच शेतकऱ्यांनीदेखील कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी आंदोलन करणे सुरु केले आहे. याच शेतकऱ्यांच्या आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे. आधीच संसदेत मंजूर झालेल्या कृषी विधेयकाला शेतकऱ्यांचा आणि अनेक पक्षांचा विरोध होता . अशातच , रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडूनही या विधेयकाला मंजुरी मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाने आता तीव्र रूप धारण केले आहे.

दिल्लीसहीत देशातील अनेक ठिकाणी आंदोलनाचे पडसाद उमटत आहेत . संताप व्यक्त करत आंदोलकांनी राजपथावरच एक ट्रॅक्टर पेटवून दिला.या घटनेननंतर फायर ब्रिगेड आणि पोलिसांची एक टीम घटनास्थळी पोहचून आग विझवली.तसेच इंडिया गेटजवळ ट्रॅक्टर आणून आंदोलकांनी कृषी कायद्यांचा निषेध व्यक्त केला.

या आंदोलनाचे आणि कृषी विधेयकाचे पडसाद राजकीय वर्तुळातदेखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. कृषी विधेयकाला विरोध करत अकाली दल एनडीएमधून बाहेर पडले आहे त्यामुळे भाजपाला झटका बसला आहे.

Related Posts
1 of 1,371

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: