शेतकरी संघटनेतर्फे भारत बंदची हाक

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मंजूर करून घेतलेल्या कृषी विधेयक विरोधात आज देशभरात अनेक शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षांनी देशव्यापी बंदची हाक दिली आहे.
मोदी सरकारने लागू केलेल्या विधेयकांमुळे शेतीमध्ये कॉर्पोरेटवाले बिनदिक्कत येतील असा आरोप अनेक शेतकऱ्यांच्या संघटनांचा आहे. तर, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी तसे काहीही होणार नसू शेतकऱ्यांशी अगदी अर्ध्या रात्री उठूनही याप्रकरणी शंकानिरसन करणारी चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
एकूणच याद्वारे नेमके काय बदल होणार, ते शेतकऱ्यांच्या हिताचे असतील की मोठ्या कंपन्या यांच्या हिताचे असतील हेच शेतकऱ्यांना समजेनासे झालेले आहे. दोन्ही बाजू आक्रमकपणे आपली बाजू मांडत आहेत. त्यामुळे काहीही माहिती नसलेले यावर काय भूमिका घ्यावी याच पेचात सापडले आहेत.