शेतकरी कायदे राज्यात लागू करण्यावर शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष !

कृषी कायद्यांवर राजकीय मंडळी आणि शेतकऱ्यांकडून सरकारवर संताप व्यक्त होत आहे. हे कायदे राज्यात लागू न करण्याची भूमिका महाविकासआघाडी सरकारमधील राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांनी जाहीर केली आहे. मात्र या कायद्यांवरून शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे .शिवसेनेने जरी या कायद्याला विरोध केला असला तरीही याबाबत ठोस भूमिका जाहीर केली नाही .
दरम्यान शेतकरी विषयक कायद्यांवरून सध्या देशातील वातावरण ढवळून निघालं आहे. संपूर्ण देशात या विधेयकाला विरोध करण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. तसेच हे कायदे मागे घ्यावे यासाठी ऑक्टोबर रोजी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार आहे.तसेच हे कायदे महाराष्ट्रात लागू करायचे नाहीत अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.काँग्रेस च्या भूमिकेला राष्ट्रवादीची साथ आहे.
शिवसेनेने लोकसभेत याबाबतच्या विधेयकांना पाठिंबा दिला होता, तर राज्यसभेत विरोधाची भूमिका घेत सभात्याग केला होता. त्यामुळे आता शिवसेनेची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.