शुटिंगदरम्यान नियमांच पालन झाला नाही तर शुटिंग बंद पाडू महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट आघाडी

कोविड न्यूमोनियामुळे ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झाले. या घटनेमुळे चित्रपट आणि मालिकांचं शुटिंग आणि सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आशालता यांना सुरक्षेच्या नियमांचं पालन न केल्यामुळे आपला जीव गमवावा लागला.
कोविड नियमांचं पालन न केल्यामुळेच ही घटना घडली असा आरोप मनसेच्या चित्रपट आघाडीने केला आहे.यापुढे शुटिंगदरम्यान नियमांच पालन होत नाही असं आढळून आल्यास शुटिंग बंद पाडू असा इशार पत्र लिहून आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना आघाडीचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.