शिवाणीने आपल्या जिद्दीने गाठले यशाचे शिखर

0 35
  श्रीगोंदा  :-  श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील शिवानी नारायण वाळुंज हिने आपल्या कष्टाच्या जिद्दीवर आई-वडिलांच्या आशीर्वादाने स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे त्यामुळे तिच्यावर तालुक्यातून शुभेच्छा असं होताना दिसत आहे.
मुळची घरची अठरा विश्व गरिबी त्यात सण 2014 मध्ये वडिलांचे छत्र हरवलं त्यावेळी  फक्त आठवीत शिकणाऱ्या शिवानी ने आज यशाचे शिखर गाठल्याने सगळीकडून तिच्यावर शुभेच्छा वर्षाव होताना दिसत आहे शिवाणीने सुरवातीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळूंज वस्ती वर झाले पुढील माध्यमिक शिक्षण टाकळी कडे येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात झाले त्यानंतर पुढील शिक्षणासाठी श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालय या ठिकाणी झाले या सर्व शिक्षणासाठी तिची आई निर्मला भाऊ वैभव यांनी शिक्षण चालू असताना वडिलांची कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली नाही त्यामुळे आज तिची आई व भाऊ आणि सर्व नातेवाईक यांच्या कुटुंब साकार झाले आहे असे माध्यमांशी बोलताना बोलताना शिवानी यांनी सांगितले.
Related Posts
1 of 1,290
पुढे बोलताना शिवानी यांनी सांगितले की आज मी ज्या यशाच्या शिखरावर पोहोचले आहे त्यासाठी माझ्या घरच्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कसाची पराकाष्टा पार केले आहे त्यामुळेच मी आज स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे त्याचबरोबर सशस्त्र सीमा बल या पदासाठी नियुक्त झाले आहे असेही माध्यमांशी बोलताना सांगितले या निवडीनंतर टाकळी कडेवळीत मधील ग्रामस्थ तालुक्यातील सर्व ठिकाणावरून शिवानी यांच्यावर मोठ्या प्रमाणात शुभेच्छा वर्षा होताना दिसत होता तसेच अनेक मोठ्या नागरिकांकडून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना दिसत होते.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: