
अहमदनगर- अहमदनगर महापालिका स्थायी समिती सभापती निवडणूकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक मनोज कोतकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून भाजपपेक्षा शिवसेनेला जास्त मोठा धक्का राष्ट्रवादीने दिला आहे. स्थायी समिती सभापती निवडणूक लढविण्यास शिवसेना इच्छुक होती आणि राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने शिवसेनेचा या निवडणुकीत विजय निश्चित मानला जात होता.
परंतु शेवटच्या दिवशी मनोज कोतकरला आपल्या पक्षात घेऊन राष्ट्रवादीने आपल्या सहकारी पक्षाला एक जोरदार धक्का दिला. त्यामुळे शहरांमध्ये राज्य सरकार चालवनाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेना यामध्येच स्थायी समिती सभापती साठी निवडणूक होणार होती . परंतू शिवसेनेने या निवडणूक होण्यापूर्वीच माघार घेतली त्यामुळे मनोज कोतकर हे स्थायी समितीचे सभापती बिनविरोध निवड झाली आहे.
ही निवडणूक मागच्या सहा महिन्यांपासून रखडली होती राज्यात कोरोनामुळे लावण्यात आलेले लॉकडाउन मुळे ही निडणूक रखडली होती आज हे निवडणुक पार पडली आहे. आता या निवडणुकीच्या काही परिणाम राज्याच्या राजकारणात होते का हे पाहावे लागेल.
स्थायी समितीतील १६ नगरसेवकांपैकी राष्ट्रवादीचे पाच शिवसेनेचे पाच भाजपाचे चार काँग्रेस आणि बसपा यांच्या प्रत्येकी एकेक नगरसेवकांच्या समावेश आहे.