DNA मराठी

शिंदे- फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत उदासीन…. ajit pawar

कोणी कसे शेण खाल्ले हे मला माहीत आहे. त्यांना असा काय झटका देणार आहे की -

0 6
aajit pawar karjat dna marathi

कर्जत : शिंदे- फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत उदासीन आहे. महागाई, बेरोजगारीवर सरकार गप्प बसत आहे, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार(aajit pawar) यांनी केली.
आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून मतदारसंघातील दहा हजार गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप केले जात आहे. या उपक्रमाची कर्जत येथे रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार रोहित पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, बाळासाहेब साळुंके आदी उपस्थित होते.

सेंद्रिय शेतीचे फायदे :-Advantages of organic farming

Related Posts
1 of 2,528

अजित पवार म्हणाले, जाहिरातीसाठी राज्य सरकारने एक हजार कोटी रुपयांचा चुराडा केला आहे. आम्ही सत्तेत असताना सर्वसामान्य मतदारांचा पैसा जाहिरातबाजीवर उडविला नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. बळीराजा संकटात असताना महाविकास आघाडीने ठोस निर्णय घेत कर्जमाफी केली होती. मात्र आताचे राज्य सरकार वेळकाढूपणा करीत आहे, अशी टीका त्यांनी केली.
अजित पवार म्हणाले जिल्हा बँकेत आपल्या सोबत असणाऱ्या संचालकांनी अध्यक्षपदाच्या निवडीत दगा दिला. काय घडले, काही नाही घडले, कोणी कसे शेण खाल्ले हे मला माहीत आहे. त्यांना असा काय झटका देणार आहे की, दहा पिढी आठवले पाहिजे. जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी, असा इशारा त्यांनी दिला.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: