शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार यंदा राज्यातील ४ वैज्ञानिकांना

0 160

पुणे – वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे विज्ञान, संशोधन क्षेत्रातील योगदानासाठी वैज्ञानिकांना दिला जाणारा शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार या वेळी राज्यातील ४ वैज्ञानिकांना मिळाला आहे . शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार यंदा राज्यातील डॉ. अमोल कुलकर्णी, डॉ. सूर्येदू दत्ता, डॉ. किंशूक दासगुप्ता आणि डॉ. यू. के . आनंदवर्धनन यांना जाहीर झाला आहे. यंदा हा पुरस्कार देशभरातील बारा वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे. त्यापैकी चार वैज्ञानिक राज्यातील आहेत. डॉ. अमोल कुलकर्णी हे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील वरिष्ठ मुख्य वैज्ञानिक आहेत.

अभियांत्रिकी विज्ञान शाखेत त्यांचे संशोधन आहे. औषधे, रंग, सुवासिक रसायने व नॅनोपदार्थ यांच्या निर्मितीत लागणाऱ्या घटकांच्या निर्मितीसाठी वापर केल्या जाणाऱ्या रासायनिक भट्टय़ांची रचना आणि विकासामध्ये त्यांनी मोठे काम केले आहे. तसेच भारतातील पहिली ‘मायक्रोरिअ‍ॅक्टर लॅबोरेटरी’ उभारण्याचा मान डॉ. कुलकर्णी यांना जातो.तर डॉ. सूर्येदू दत्ता आणि डॉ. यू. के . आनंदवर्धनन आयआयटी मुंबईमध्ये कार्यरत आहेत.

Related Posts
1 of 2,076

 डॉ. दत्ता हे भूवैज्ञानिक असून, डॉ. आनंदवर्धनन गणित वैज्ञानिक आहेत. डॉ. दासगुप्ता भाभा अणू संशोधन केद्रात काम करतात. शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या ७९ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूविज्ञान, आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री आणि सीएसआयआरचे उपाध्यक्ष डॉ. हर्षवर्धन यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले.  विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ४५ वर्षांंपर्यंतच्या शास्त्रज्ञांना, पुरस्कार वर्षांच्या आधीच्या पाच वर्षांतील संशोधनाबद्दल हा पुरस्कार दिला जातो.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: