DNA मराठी

शहर जिल्हा काँग्रेसच्या संघटनात्मक बैठकीचे शुक्रवारी आयोजन-शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे

0 82

अहमदनगर -अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी किरण काळे यांची नियुक्ती झाल्यापासून संघटनात्मक कामाला वेग आला आहे. शुक्रवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस आणि सर्व फ्रंटलच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे.

प्रशासनाच्या सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करून ही बैठक माऊली मंगल कार्यालय या ठिकाणी सकाळी साडेदहा वाजता पार पडणार आहे. बैठकीसाठी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, माजी महापौर दीप चव्हाण, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

अहमदनगर शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने सध्या विविध बैठकांचे सत्र सुरू आहे. महसूलमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच १४ ऑगस्ट रोजी पक्षाच्या शहर आणि जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये किरण काळे यांची अहमदनगर काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी निवड केल्याची घोषणा केली होती. राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मान्यतेने त्यांची निवड करण्यात आल्याचे पत्र त्यांना पक्षाच्या वतीने तदेण्यात आल्या होते.

Related Posts
1 of 2,489

काळे यांची निवड झाल्या पासून नगर शहरामध्ये काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवरती बुधवारी आ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये अहमदनगर शहर काँग्रेसची कार्यकारिणी गठित करण्यात संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे.

बैठकीमध्ये युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस, माहिती व तंत्रज्ञान विभाग, सोशल मीडिया विभाग, महिला काँग्रेस, अल्पसंख्यांक विभाग, मागासवर्गीय विभाग, सेवादल विभाग, डॉक्टर सेल, वकील सेल, व्यापारी सेल, क्रीडा विभाग, असंघटित कामगार विभाग यासह विविध विभागांच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

बैठकीमध्ये संघटनात्मक कामांचा आढावा घेतला जाणार असून नवीन चेहर्‍यांना संधी देण्याच्या दृष्टीने संघटनात्मक चर्चा या वेळी पार पडणार आहे. बैठकीला प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष काळे यांनी केले आहे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: