शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने कामगारांच्या साह्यांच्या मोहिमेचा आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत सोमवारी शुभारंभ

0 42

अहमदनगर  – शेतकरी आणि कामगार यांच्याबाबत केंद्राने केलेल्या अन्यायकारक कायद्याच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यभर मोहीम उघडण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या आदेशावरून नगरमध्ये शहरातील कामगारांच्या सह्यांच्या मोहिमेचा शुभारंभ आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोमवारी होणार असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे. 


कामगारविरोधी कायद्यांमुळे कामगारांवर कुऱ्हाड कोसळली आहे. कामगार वर्गामध्ये या धोरणाबाबत नकारात्मक भावना आहे. त्यामुळे नगर शहरातील कामगारांचा आवाज बनत शहर जिल्हा काँग्रेस कामगारांच्या सह्यांचे निवेदन गोळा करून ते प्रदेश कॉंग्रेसच्या माध्यमातून केंद्र सरकारला पाठवणार असल्याचे काळे यांनी म्हटले आहे. 


सकाळी ११.३० वाजता अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये हा शुभारंभ होईल. त्यानंतर दुपारी २.०० वाजता नगर तालुका, पारनेर, पाथर्डी व शेवगाव तालुक्याच्या तालुकाध्यक्ष, तसेच जिल्हा कार्यकारिणीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आ.तांबे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या सह्यांच्या मोहिमेचे नियोजन आ. तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांनी दिली आहे. 

Related Posts
1 of 1,357

शहर जिल्हा काँग्रेसचा कामाचा धडाका –

किरण काळे यांनी शहर जिल्हाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यापासून नगर शहरामध्ये काँग्रेसच्या कार्यक्रमांचा धडाका सुरू आहे. दररोज वेगवेगळे विषय घेऊन शहरात सातत्याने काँग्रेस आक्रमकपणे काम करताना दिसत आहे. हाथरस प्रकरण, राहुल गांधी यांना झालेली धक्काबुक्की, शेतकरी – कामगार विरोधी कायद्यांच्या निषेधासाठी धरणे आंदोलने यामुळे शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. यातच आता आ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीमध्ये शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वात कामगारांच्या सहयांच्या मोहिमेचा होणारा शुभारंभ हा देखील शहरात चर्चेचा विषय झाला आहे. 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: