शहरामध्ये नटराज हॉटेल येथे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कोविड सेन्टरचे उदघाटन

अहमदनगर – शहरा मधील कोटला परिसरात आज ५ सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टी,दीनदयाल पत संस्था आणि अहमदनगर महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नटराज हॉटेल या ठिकाणी १०० बेडचे कोविड केयर सेंटरचे उदघाटन भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते तसेच माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार होणार आहे. तसेच रुग्णांची संख्या वाढल्यास बेडची ही संख्या वाढवण्यात येथील असे या वेळी राधाकृष्ण विखे पाटील याने म्हंटले आहे.