बातम्या शहराचा पुढचा आमदार भाजपचाच होणार… कार्यकर्त्यांनी कामाला लागावे… By admin Last updated Aug 14, 2020 0 87 Share Related Posts स्त्री जन्माचे स्वागत परिवाराने काढली मुलीची रथातून मिरवणूक May 29, 2023 पतीने केला पत्नीचा खून May 29, 2023 नेवाशात भेसळयुक्त दुधाची सर्रास विक्री? May 25, 2023 Prev Next 1 of 2,489 भारतीय जनता पक्षाला येणारे दिवस फार चांगले आहेत. नगर शहरात भाजपाने नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, खासदार, राज्य व केंद्रीय मंत्री आदि लोकप्रतिनिधी दिले भाजपला आमदारकी मिळवणे अवघड नाही. राज्यात भविष्यात मध्यवर्ती विधानसभा निवडणुका होवू शकतात. शहरात अनुकूल वातावरण असल्याने भाजपाच्या नव्या पदाधिकार्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे. शहराचा पुढील आमदार भाजपचाच होईल अशी महत्वकांक्षा शहर भाजपाच्या पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी बाळगावी. शहरजिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी सर्व गट तट बाजूला ठेऊन सर्व समावेशक अशी चांगली नवी कार्यकारणी निवडली आहे. त्यामुळे ही कार्यकारणी आपला कामाचा चांगला ठसा उमटवेल, असे प्रतिपादन पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांनी केले. पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या वतीने शहर भाजपाच्या नूतन कार्यकारणीच्या पदाधिकार्यांचा सत्कार पतसंस्थेच्या कार्यालयात करण्यात आला. प्रा. मधुसूदन मुळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे सचिव विकास पाथरकर, जेष्ठ सभासद एल.जी. गायकवाड आदींच्या हस्ते शहराजिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, नूतन ग्रामीण जिल्हा संघटन सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, शहर संघटन सरचिटणीस अॅड. विवेक नाईक, उपाध्यक्ष सुधीर पगारिया, सचिन पारखी, संतोष गांधी, शिवाजी दहींडे, सरचिटणीस तुषार पोटे, महेश नामदे, युवामोर्चा अध्यक्ष महेश तवले, महिला आघाडी अध्यक्षा अंजली वल्लाकट्टी आदींसह सर्व नूतन पदाधिकार्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. महेंद्र गंधे म्हणाले, भाजपची कार्यकारणी निवडतांना सर्वांशी सल्लामसलत करून प्रत्तेक घटकाला कार्यकारणीत स्थान दिले आहे. पक्षात जो चांगले काम करतो त्याच्या कामाची दखल पक्ष कायमच घेत असतो. त्यामुळेच तुम्हाला हे पद मिळाले आहे. पंडित दीनदयाळ पतसंस्था परिवाराने केलेला सत्कार हा प्रोत्साहन देणारा आहे. प्रा. मधुसूदन मुळे म्हणाले, देशातील सर्त्वत मोठ्या राजकीय पक्षाचे तुम्ही पदाधिकारी झालात याचा अभिमान बाळगा. चांगले काम करण्यासाठी जेष्ठांच्या विचारावर काम करून, अभ्यास करून काम करा. निश्चित पक्ष याही पेक्षा मोठ्या उंचीवर जाईल. प्रताविकात विकास पाथरकर यांनी दीनदयाळ पतसंस्थेच्या सामाजिक कामाची माहिती दिली. शहर भाजपाच्या नूतन कार्यकारणीत दीनदयाळ पतसंस्थेशी जोडलेले अनेक पदाधिकारी असल्याचा आनंद होत आहे, असे सांगितले. पै.अंजली वल्लाकट्टी यांनी सत्कारास उत्तर दिले. सुत्रसंचलन नरेंद्रश्रोत्री यांनी केले. आभार विवेक नाईक यांनी मानले. या कार्यक्रमात भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख अमित गटणे, हुझेफा शेख, ओंकार पठाडे, युवामोर्चा सरचिटणीस उमेश साठे, आशिष अनेचा, अमोल निस्ताने, व्यापारी आघाडीचे विलास गांधी, अल्पसंख्याक आघाडीचे जहिरऊद्दिन सय्यद, एससी आघाडी राम वडागळे, डॉक्टर आघाडी डॉ. विलास मढीकर, अध्यात्मिक आघाडी प्रद्युम्न जोशी, जेष्ठ नागरिक आघाडी अशोक सरनाईक, क्रीडा आघाडी प्रा. संजय धोपावकर, बंटी डापसे, बाळासाहेब खताडे आदींचा सत्कार करण्यात आला. Like this:Like Loading... Related 0 87 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmailLinkedinTelegram