शरद पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट

नवी दिल्ली- केंद्रीय ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. भेटीनंतर त्यांनी सांगितले की राज्यांमधील साखर कारखान्यात निर्माण होणारे प्रश्न कसे मार्गी लावता येतील यासाठी मी शरद पवार यांची भेट घेतली राज्यातील अनेक साखर कारखाने (NPA) मध्ये गेली आहेत .बँका पैसे उपलब्ध करून देत नाही यामुळे शेतकरी सुद्धा अडचणीत येऊ शकतात सरकारने यासाठी कशी उपाययोजना करावी याची चर्चा करण्यासाठी मी शरद पवारांना भेटले. या महिन्यात शरद पवार यांचे मला तीन वेळा साखर कारखान्याच्या प्रश्नाबाबत फोन आला होता म्हणून मी त्यांना भेटायला आलो आहे असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
कांदा निर्यातबंदीबाबत पंतप्रधानांशी भेटणार –
केंद्र सरकारने लावलेल्या कांदा निर्यातबंदीमुळे राज्यातील शेतकरी नाराज आहे . मी या प्रश्नावर पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे असे केंद्रीय ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.दरम्यान काल रावसाहेब दानवे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती