शरद पवारांची केंद्र सरकारवर टिका

0 43

शरद पवार यांनी केंद्रसरकारची खिल्ली उडवली आहे. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणं म्हणजे गंमत नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी ही टीका केली. निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राची छाननी करण्यात येत आहे. त्याबाबत पवारांना पत्रकारांनी छेडले असता, मला पहिली नोटीस इन्कम टॅक्स कार्यालयाकडून आली आहे
देशातील इतक्या सदस्यांमध्ये आमच्याबद्दल प्रेम आहे. त्याबद्दल आनंद झाला, असं पवार म्हणाले.

या नोटिसीतून मला काही माहिती विचारण्यात आली आहे. त्यामुळे नोटिसीचं उत्तर द्यावं लागेल. नाहीतर दंड असतो त्यामुळे त्या नोटिसीचं उत्तर देणार आहे, असंही ते म्हणाले. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं आघाडी सरकार आहे म्हणून जाणूनबुजून नोटीस बजावण्यात आली आहे का? असा प्रश्न विचारला असता त्याचं उत्तर देणं पवारांनी टाळलं.

Related Posts
1 of 1,371

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येणार असल्याचे विविध लोक सांगत आहेत, त्याबाबत तुमचं मत काय? असं पवारांना विचारलं असता हे विविध लोक कोण आहेत? त्यांचा संपूर्ण देशावर काय प्रभाव आहे?, असं सांगतानाच राष्ट्रपती राजवट लागू करणं गंमत आहे का?, असा सवालही त्यांनी केला.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: