शब्दांच्या पलीकडले हे नाते सांगणाऱ्या लग्नाची कहाणी…..

0 72

शब्दांच्या पलीकडले हे नाते सांगणाऱ्या लग्नाची कहाणी A (marriage that speaks of a relationship beyond words)

अहमदनगर : – ना जात ना पात देवाने खरच जात हा शब्द केला असेल का, आज जातीच्या नावाखाली अनेकांचे बळी जातंय ऑनरकीलिंग सारख्या घटना घडतंय, मात्र अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील मुंगी या गावातील घटनेनंतर आपण हे सगळे विसरुन जाऊ नये नक्की, शेवगाव तालुक्यातील बोधेगाव जवळील मुंगी या छोट्या गावात एक लग्नात एक मुसलमान मामा आपल्या मानलेल्या हिंदू बहिणीच्या मुलींना कन्यादान केले. आणि मुलींनीही सासरी जाण्यापूर्वी पाठवताना त्यांच्या गळ्यात पडून राडल्या यावेळी मामालाही आले अश्रूंणावर झाले, या वेळी एका क्लिकने मन सुन्न झाले,

Related Posts
1 of 1,487

अहमदनगर जिल्ह्यातील  शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे सविता भुसारी या शेतकरी कुटुंबातील असून, त्यांना दोन मुली आणि एक मुलगा असा छोटा परिवार आहे. नवऱ्याने सोडून दिल्याने त्या आईवडिलांकडे राहत आहेत. आईवडील कडेच छोटे मोठे काम करून त्यांच्या मुलींना मोठे केले. मुलींच्या आईला भाऊ नसल्याने त्यांनी घरासमोर राहणाऱ्या बाबा पठाण यांना गुरू भाऊ मानले आहे. बाबा पठाण यांनी देखील जाती-पातीच्या पलीकडे जाऊन भावाचे कर्तव्य आणि माणुसकीचा धर्म दाखवत हिंदू मुलींचे मामा होऊन कन्यादान केले. एव्हढेचं नव्हे तर विवाहाचा अर्धा खर्च करुन मानलेल्या बहिणीच्या मुलींच्या सुखी संसाराला सुरुवात करुन दिली शेवगाव तालुक्यातील मुंगी याठिकाणी झालेले या लग्नात फोटोग्राफरच्या एका क्लिकने मन सुन्न झाले, आणि सामाज्याच्या ठेकेदारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: