व्ही आर डी ई ही संस्था हलविण्याच्या घटनेचा काँग्रेसकडून तीव्र निषेध

0 30

  अहमदनगर –  अहमदनगरची ओळख असलेली  व्ही आर डी ई ही संस्था हलविण्याच्या घटनेचा काँग्रेसकडून तीव्र निषेध अभिजीत लुणिया यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचे वेधले लक्ष

अहमदनगरचीच नव्हे तर राज्याची ओळख असलेली व्हेईकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट ईस्टॅब्लिशमेंट अर्थात व्ही आर डी ई संशोधन संस्था अहमदनगर येथून चेन्नई येथे हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या त्या घटनेचा काँग्रेसच्या इंटक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अभिजीत लुणिया यांनी केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी यात लक्ष घालून ही संस्था अहमदनगर येथून हलवून देऊ नये यासाठीचे आवाहन त्यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.

 

                हे पण वाचा – बाळ बोठे विरोधात स्टँडिंग वॉरंट. बाळ बोठेच्यात अडचणीत 

या निवेदनात इंटक काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष अभिजित लुणिया यांनी म्हटले आहे की नगर दौंड रस्त्यावर असलेली ही संशोधन संस्था केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाअंतर्गत असून संस्थेच्या देशभरात ५२ शाखा आहेत त्यात महाराष्ट्र राज्यात अहमदनगर येथे ही संशोधन संस्था आहे नगरच्या संस्थेच्या प्रयोगशाळेत वाहनांची तपासणी करण्याचा विशिष्ट ट्रॅक असून संरक्षण विभागासाठी आवश्यक असलेली वाहने आणि इतर अन्य सामग्री येथे विकसित झाली आहे, संपूर्ण राज्याला अत्यंत भूषणावह असे रीसर्च सेंटर येथून चेन्नई येथे हलविले जात असल्याने नगरमधील हजारो कुटुंबे यामुळे बेघर होणार आहेत त्याचा नगर जिल्ह्याच्या विकासावर देखील मोठा परिणाम होणार असून हजारो एकर मध्ये विस्तारलेली ही संस्था स्थलांतरित झाल्यावर या कुटुंबाच्या रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे तसेच या जागेचे सरकार काय करणार हा ही मोठा प्रश्न पुढे उभा ठाकला आहे .
१९४७ साली अहमदनगर येथे जामखेड रस्त्यावर TDE ( टेक्निकल डेवलपमेंट इस्टाब्लिशमेंट या नावाने  सुरू झालेले हे रिसर्च सेंटर १९५८ साली DRDO ने  VRDE या नावाने रिडीझाईन केले व १९६२ साली ते अंमलात आणले व ते दौंड रोडवरील हजारो एकर जागेत वसविण्यात आले, जागतिक दर्जाचे संशोधन या रिसर्च सेंटरमध्ये चालत असुन तेथे वाहनांचा तपासणी ट्रॅक तसेच अन्य संशोधन यंत्रणादेखील जागतिक दर्जाची असून या रिसर्च सेंटरचे कार्य हे अनेक दिग्गजांकडून गौरवण्यात आले असल्याचेही लुणिया यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे या रिसर्च सेंटरमध्ये भारताच्या सशस्त्र सेनेला लढण्यासाठी लागणारी शस्त्रे, रणगाडे ,मिसाईल, लॉन्चर, बुलेट-प्रुफ वाहणे, प्रोटोटाइप, ड्रोन इंजिन इत्यादी उपलब्ध करून दिले जाते भारताला आत्मनिर्भर करण्यात या रिसर्च सेंटरचा महत्त्वाचा मोठा वाटा आहे असे असतांना पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताच्या घोषणेलाच संरक्षण विभागामार्फत हरताळ फासला जात आहे व्ही आर डी ई मध्ये सध्या उच्चपदस्थ अधिकारी, शास्त्रज्ञ,वैज्ञानिक, कर्मचारी असे हजारो  लोक काम करत असुन त्यांची उपजीविका या रिसर्च सेंटरवर चालते या माध्यमातून स्थानिकांना मोठा रोजगार उपलब्ध आहे.
Related Posts
1 of 1,301

 अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांना मँट कोर्टाचा मोठा दिलासा 

यामुळे अहमदनगर मधील व्यवसायात मोठ्या प्रमाणात वृद्धी झालेली आहे ही संस्था बाहेर गेल्यास हजारो लोक बेरोजगार होणार आहेत , त्यामुळे हा प्रकल्प येथून हलविण्याचे थांबवावे यासाठी श्री लुणिया यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉक्टर सुधीर तांबे साहेब व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांना आग्रहाची विनंती केली आहे लवकरच या बाबतीत नामदार बाळासाहेब थोरात साहेब, आमदार डॉ. सुधीर तांबे साहेब  व सत्यजित दादा तांबे यांना एक शिष्टमंडळ भेटणार असल्याचे देखील या निवेदनात लुणिया यांनी म्हटले आहे. सरकारने सदर संस्था ही हलविण्याचे थांबवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यां मार्फत मोठी  सह्यांची मोहीम  उभारली जाईल असेही लुणिया यांनी आपल्या निवेदनात  म्हटले आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: