व्हिडिओ उपलब्ध असून सुद्धा न्यायालय का म्हणते पुरावे नाही – नवाब मलिक

मुंबई- मागच्या वर्षाखेर रामजन्मभुमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर या मंदिराच्या निर्माणाचा मार्ग मोकळा झाला होता. बाबरी मशिद विध्वंस प्रकरणी सीबीआय चौकशी नेमण्यात आली होती. आज ३० सप्टेंबर रोजी लखनऊ विशेष न्यायालय या प्रकरणी निकाल सुनावला आहे.
बाबरी विध्वंस हा पूर्वनियोजित कट नसून ती एक उस्फुर्त घटना होती. या प्रकरणात सबळ पुरावे देखील नाहीत. त्यामुळे या ४२ जणांना या घटनेचे दोषी मानू शकत नाही.
न्यायालयाच्या या निकालात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या निकाल नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कामगार आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘देशातील न्यायालयांकडून निर्णय येतात. त्यावरून आश्चर्य नाही. या घटनेचे सगळीकडे व्हिडिओ आहे. तरी पुरावे नाही असं न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणावर न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे आश्चर्य वाटत नाही’ अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे.