वॉटर किंग झोंग शानशान  बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती 

0 32

नवी दिल्ली –  भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी  मागच्या काही वर्षांपासून आशिया खंडातील सुध्दा सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. मात्र आता मुकेश अंबानीला मागे टाकत चीनमधील वॉटर किंग म्हणून ओळखले जाणारे व्यावसायिक झोंग शानशान हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे.

हे पण पाहा –   रेखा जरे हत्याकांड । रेखा जरे यांना न्याय मिळून देण्यासाठी कँडल मार्च

यावर्षी  झोंग शानशान यांच्या नेटवर्थ ७०.९ अब्ज डॉलर्सवरून वाढून ७७.८ अब्ज डॉलर्स इतके झाले आहे.  झोंग शानशान हे  मिनरल वॉटर आणि कोरोनाची लस विकसित करण्याचा त्यांचा  व्यवसाय आहे. झोंग शानशान हे आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहे त्याच बरोबर ते संपत्तीच्या बाबतीत चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अलिबाबाच्या जॅक मा यांनाही मागे टाकलं आहे.

राज्य निवडणूक आयोगाने रोहित पवारांची सखोल चौकशी करावी – राम शिंदे

Related Posts
1 of 1,292
पत्रकारिता, मशरूमचं उत्पादन, आरोग्य सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये काम केल्यानंतर आता ते आशियातील सर्वाक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार यावर्षी झोंग यांची संपत्ती वाढून ७७.८ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. यावर्षी त्यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळेच ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांच्याबाबत चीनच्या बाहेर फारच कमी लोकांना माहिती आहे.ते आता ६६ वर्षीय आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: