“विषाची परीक्षा”  मिथील अल्कोहोल पांगरमल सारखे, मग तसा तपास होणार का ? गुटखा किंगला आशिर्वाद कुणाचा ?

0 33
अहमदनगर – २०१७ मध्ये राज्यात खळबळ उडून देणाऱ्या पांगरमल राजकीय दारूकांडाने राज्यभर खळबळ उडाली होती. त्या दारूत  मिथील अल्कोहोलचे अवशेष सापडले होते ते अवशेष भिंगार हद्दीती  २०१७ मध्ये मयत झालेल्या गुन्ह्यात तब्बल ३ वर्षांनी पोस्टमार्टमचा अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल झाला.  भिंगार परिसरातील मोमिनगल्लीच्या कटवणात झालेल्या मृत्यूचा कारण आता स्पष्ट झाले आहे. हा मृत्यू विषारी दारू पिल्याने झाला आहे. असा रिपोर्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. या प्रकरणाचा तपास मागच्या तीन वर्षापासून सुरू होता. अनेक दिवस  तपासावर असलेल्या या प्रकरणाच्या पुन्हा पीएम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिपोर्ट पोलिसांनी मागविला होता. हा रिपोर्ट आल्यानंतरच पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. मृत्यू झालेल्या व्यक्तीला मारहाणीत मार लागल्याने तसेच मारहाणीत विषारी दारू देण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. ही बाब आता निष्पन्न झाली आहे. या गुन्ह्यात ही दारू कुठून आली हे शोधणे महत्वाचे आहे. कारण २०१७ मध्ये अहमदनगर तालुक्यातील पांगरमला दारूकांड झाले होते. या विषारी दारूकांडात ९ जणांचा बळी गेले होते, या काळात भिंगार आणि तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. या गुन्हाच तपास त्या अनुषंगाने होणे अपेक्षित होते. 
 
कारण विषारी दारूमुळे ९ जणांचा  बळी गेल्याने  पांगरमल दारूकांडाने राज्यभर खळबळ उडाली होती. ज्या विषारी दारूने ९ बळी घेतले होते त्या दारूच्या मध्ये  मिथील अल्कोहोल  असल्याचा आभिप्राया होता. मग त्याचा वेळेस हि घटना घडली होती याचाही तपास त्या अनुषंगाने करणे अपेक्षित होते मात्र तसे होताना दिसत नाही.
Related Posts
1 of 1,301
   
 भिंगार हद्दीत घडलेल्या या घटनेचा मयत रमेश उर्फ रमाकांत खबरचंद काळे शव हे वैद्यकीय अधिकारी सिव्हील हॉस्पीटल, अहमदनगर यांनी औरंगाबाद येथे पोस्टमार्टम पाठविण्यात आले होते. त्यानंतर पोस्ट मार्टम रिपोर्ट प्राप्त झाला होता. त्यानंतर तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके नगर विभाग यांनी जा.क्र. 2799/2019 दि.14/05/2019 रोजी सादर केलेली होते. त्यांनी तपासाच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता भा.द.वि. 302, 328, 323, 34 प्रमाणे आरोपी शिक्षापात्र ठरतो असा अभिप्राय दिला. त्यानंतर २०१९ नंतर  २०/१२/२०१९ ला अखेर या गंभीर गुन्हा दाखल झाला.  मात्र इतका गंभीर गुन्हा असतांना तपास त्या अनुषंगाने होणे अपेक्षित होते   मात्र त्या घटनेवर तपास झाला नाही. उलट ३०२ सारख्या गुन्ह्यात आरोपीला आणून ठेवले आणि सोडून दिले आहे.  कारण या गुन्ह्यातील आरोपीचा नातेवाईक मोठा गुटखा किंग आहे. गुटखा तस्कर आणि काही पोलिसांचे हित संबंध असल्यामुळे हे प्रकरण कसे मिटवता येईल यासाठी प्रयत्न सुरु आहे मिळालेल्या माहिती नुसार फिर्यादीला हाताशी धरून १६९ साठी तस्कर प्रयत्न करत आहे. 
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: