विनाअनुदानित शिक्षक आणि शिक्षकत्तेर महासंघाचे शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन

0 44

अहमदनगर – जिल्ह्यातील खाजगी शिक्षण क्षेत्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय  हक्कासाठी झडणाऱ्या विनाअनुदानित शिक्षक आणि  शिक्षकेतर महासंघाच्या वतीने माध्यमिक शिक्षकांधिकारी मा .श्री रामदास हराळ साहेबआणि  प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री . रमाकांत काटमोरे यांना महासंघाच्या वतीने  खाजगी शैक्षणिक क्षेत्रातील इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांना उपसा मारीस सामोरे जावे लागत असून या काळात शासनाने या शिक्षकांना दरमहा  मासिक पंधरा हजार रुपये मानधन मदत  देऊन या शिक्षकांना आधार देण्यात यावा .

कोरोना मुळे आज शिक्षक आपल्या अडीअडचणी बाजूला ठेवून  विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणामध्ये कोणताही व्यत्यय न आणता या शिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे करीत आहे . त्याला मिळालेल्या वेळेत स्टेशनरी दुकान ,कांदा कापूस खरेदी केंद्र , भाजीपाला विक्री केंद्र, मोलमजुरी आदी  ठिकाणी कष्ट घेऊन  आपल्या कुटुंबाचा  उदरनिर्वाह मोठ्या काटकसरीने करीत आज करत आहे .  

Related Posts
1 of 1,371

याची शासनाने दखल घ्यावी  म्हणून या बाबतचे निवेदन यावेळी सर्व शिक्षक आणि  शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने आज विनाअनुदानित शिक्षक आणि शिक्षकत्तेर महासंघाचे शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन दिले या वेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अँड् .श्री सुभाष जंगले उपप्राचार्य श्री विनोद जोशी , श्री विजय शिंदे, क्रीडा शिक्षक श्री गौरव डेंगळे ,श्री श्रीकांत लांडे आदीउपस्थित होते .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: