विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन झाले सुरू

मुंबई- आज राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे कोरोनाच्या पार्श्वभमीवर.
या पावसाळी अधिवेशनाच्या कालावधी इतिहासातच प्रथम दोन दिवसाच्या होणार आहेत .विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना अधिवेशन सुरू होण्याच्या अवघ्या दोन दिवसापूर्वी कोरोना संसर्ग झाला.
यामुळे ते या अधिवेशनापासून दूर राहणार आहे. दरम्यान अधिवेशन पूर्वी प्रत्येक आमदार आणि विधानसभा भवनातील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. शनिवारी १७७० चाचण्या करण्यात आले होते. त्यापैकी ३७ जणांची कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे .
तसेच रविवारी करण्यात आलेल्या चाचणीचा अहवाल आज प्राप्त होणार आहे महाराष्ट्रात आतापर्यंत ३५ आमदार आणि पाच मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.