विद्युत ट्रान्सफार्मर चोरी करणारा आरोपी कोतवाली पोलीसांकडुन जेरबंद

0 25

अहमदनगर  –  मागच्या १५ वर्षांपासून विद्युत महामंडळच्या विद्युत ट्रान्सफार्मर बसविन्याचे काम करणारे मनिष कुमार दत्तात्रय गिडे यांनी शिवाजी नगर- कल्याण रोड ,अहमदनगर येथे  बसवलेला विद्युत ट्रान्सफार्मर  चोरीस गेल्याने आपली फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दिली असता कोतवाली पोलिसांनी याप्रकरणात कारवाई करून आरोपीला अटक केली आहे.

या बाबत मिळालेली माहिती अशी कि  दि १० ऑक्टोंबर २०२० रोजी फिर्यादी मनिष कुमार दत्तात्रय गिडे रा सोलापुर यांनी फिर्याद दिली की, मी साईदिप बिडकॉन प्रा लि पुणे या कंपनी मार्फत अहमदनगर शहरात विद्युत महामंडळच्या विद्युत ट्रान्सफार्मर बसविन्याचे मागील १५ वर्षापासुन काम करतो, आमचे कंपनी मार्फत विद्युत ट्रान्सफार्मर बसवन्याचे काम अहमदनगर, यवतमाळ, आकोला, उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये चालते, सदर कामा करीता मी प्रत्येक जिल्ह्याकरीता एक सुपरवायझरची नेमणुक केली आहे.

  जामखेड तालुक्यातील खूरदैठण ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध

ऑक्टोबर २०२० रोजी माहीती दिली कि, दि ११ ऑगस्ट २०२० रोजी आपन शिवाजी नगर कल्याण रोड अहमदनगर या ठिकाणी बसवलेला विद्युत ट्रान्सफार्मर हा चोरीस गेला आहे.  मी त्या बाबत खात्री केली व सदर बाबत माझा या पुर्वीचा सुपरवायझर गणेश भारत पौळ रा बैरागवाडी ता मोहोळ जि सोलापुर ज्याला मी दारु पिन्याचे कारनावरुन कामावरुन काढुन टाकले होते व कचरु भुसारी रा आखतवाडी ता शेवगाव जि अहमदनगर यांनी चोरुन नेल्याचा मला संशय आहे, वगैरे मजकुरच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं । ६०४३ /२०२० भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा रजि. दाखल करण्यात आला होता.

           कोरोनारुग्णांना लुटणारे  १५  हाॅस्पिटल प्रशासनाच्या रडारावर..

Related Posts
1 of 1,290

सदर गुन्ह्याचा तपास व आरोपीचा शोध घेत असताना कोतवाली पोलीस ठाणे गुन्हे शोध पथक यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गुन्ह्यातील चोरीस गेला माल विद्युत ट्रान्सफार्मर हा एका पिकअप वाहनात भरुन तो पिकअप हा सोनई ता नेवासा या परिसरात सोडुन सदरचे आरोपी तेथुन पळुन गेले आहेत अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राकेश मानगांवकर यांनी गुन्हे शोध पथकाचे सपोनि विवेक पवार व स्टाफ यांना सदर माल ताब्यात घेवुन फरार आरोपी यांचा शोध घेण्याबाबत मार्गदर्शन केले प्रमाणे आरोपी नामे कचरु मच्छिद्र भुसारी रा आखदवाडी शेवगाव जि अहमदनगर यास ताब्यात घेवुन त्यास विचारपुस करता त्याने प्रथम उडवाउडविची उत्तरे दिली.

त्यास अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर ठिकाणीवरुन खालील वर्णनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. १) १,५०,०००/- रु किं चा एक विटकरी रंगाचा विद्युत ट्रान्सफार्मर त्याचेवर MANISHA ENGEREEING PVT LTD असे लिहीलेले २) ३,००,०००/- रु किंचा एक महीन्द्रा कंपनीचा पांढरे रंगाचा पिकअप त्याचा क्रं MH १६AY ११६३ असा असलेला त्याचे पुढील काचेवर भैरवनाथ प्रसन्न असे लिहीलेले जुवा.कि.अं. ४,५०,०००/- एकुण सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील सो, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री. सौरभ अग्रवाल सो, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल शरद ढुमे सो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक राकेश मानगांवकर सो, व गुन्हे शोध पथकाचे सपोनि विवेक पवार, पोना रविंद्र टकले, पोना विष्णु भागवत, पोना नितीन शिंदे, पोना शाहीद शेख, पोकाँ भारत इंगळे, पोकॉ सुमित गवळी, पोकाँ तान्हाजी पवार, पोकाँ प्रमोद लहारे, पोकाँ सोमनाथ राउत, पोकाँ सुशिल वाघेला, पोकाँ सुजय हिवाळे यांनी सदरची कारवाई केली आहे.

  हे पण पहा – स्टॅंडिंग म्हणजे काय? बाळ बोठेला फरार घोषित करण्यासाठी स्टॅंडिंग वॉरंटसाठी न्यायालयात 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: