विजेच्या लपंडाव न थांबवल्यास जन आंदोलन – अंकुशराव ढवळे माज उपसभापती

0 32
जामखेड – पिंपरखेड, हसनाबाद परिसरात मागील महिन्यापासून विजेचा लपंडाव चालू असून शेतीतील पिकांना पाणी देता येत नाही तसेच सिंगल फेजची विज बारा ते चौदा तास येत नाही याबाबत महावितरण सातत्याने दुर्लक्ष करीत असून येत्या आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न केल्यास जन आंदोलन उभारण्याचा इशारा पंचायत समितीचे माजी उपसभापती अंकुशराव ढवळे यांनी  दिला.
पंचायत समितीचे माजी उपसभापती अंकुशराव ढवळे म्हणाले, यावर्षी चांगला पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर रब्बी पिके शेतकऱ्यांनी घेतली आहे. अरणगाव फिडरमधून पिंपरखेड व हसनाबाद तसेच परिसरात वीजपुरवठा होतो परंतु महीनाभरापासून विजेचा लपंडाव चालू आहे त्यामुळे पिकांना पाणी देता येत नाहीत ” आली आली म्हणूस्तर लाईट जाते” रात्रीच्या वेळी विज तीन ते चार तास मिळते परंतु त्यामध्ये भरणे होत नाही. दिवसा लाईट असेल तर ती कमी दाबाने असते त्यामुळे ती वारंवार जाते.
Related Posts
1 of 1,292
रब्बी ज्वारीला पाण्याची गरज होती तर ते वेळेवर मिळत नाही सध्या दाणे भरत आले  तसेच गव्हाला ओंब्या येत आहे अशावेळी पाण्याची आवश्यकता आहे परंतु पुरेशा दाबाने वीज नसल्याने हातातोंडाशी आलेला घास मानव निर्मित कृपेने जाण्याची शक्यता आहे. शेतीसाठी विज मिळत नाही तर दुसरीकडे सिंगल फेजमधून घरगुती ग्राहकांना १४ ते १५ तास विज मिळत नाही अनेकदा रात्र अंधारात जागून काढावी लागते परंतु महावितरण याकडे दुर्लक्ष करीत आहे. आठ दिवसांत विजपुरवठा सुरळीत न झाल्यास जन आंदोलन उभारण्यात येईल असे अंकुशराव ढवळे म्हणाले.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: