विकास फक्त बारामतीतच होतोय, राष्ट्रवादीच्याच नेत्याकडून पवारांना टोला !

राष्ट्रवादीच्या गोटातून सध्या धक्कादायक माहिती समोर येत आहे.राष्ट्रवादीच्याच आमदारांनी पवारांवर टीका केली आहे. आमदार दिलीप मोहिते यांनी थेट पवारांवर आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे-पुणे जिल्ह्यात विकास फक्त उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीत होत आहे. असे वक्तव्य करत दिलीप मोहिते यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
दिलीप मोहिते सध्या आपल्याच पक्षावर टीका करीत आहेत. तसेच त्यांनी पवारांना टोला देत आपण वेगळा विचार करण्याचा इशारादेखील दिला आहे. दिलीप मोहिते हे इच्छुकमंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज झाले होते.
विकास फक्त अजित पवार यांच्या बारामतीत होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे . याआधीही देखील दिलीप मोहिते यांनी आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांविरोधी वक्तव्य केली आहेत . आता राष्ट्रवादी त्यांच्याविरुद्ध काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे आहे.