विकास कामांमुळे दिघोळ माळेवाडी मधील जनता जय हनुमान ग्रामविकास पॅनल बरोबर-मच्छिंद्र गीते

0 29

जामखेड – मागील दहा वर्षांत केलेल्या विकास कामांमुळे दिघोळ माळेवाडी मधील जनता जय हनुमान ग्रामविकास पॅनल बरोबर आहे. तसेच गावातील लोकांना मोफत दळण देण्याची योजना मार्गी लावण्यासाठी तसेच विकासासाठी संपूर्ण पॅनल बहुमताने विजयी होणार आहे असे पॅनल प्रमुख मच्छिंद्र गीते यांनी प्रचाराचा नारळ फोडताना सांगितले.

दिघोळ माळेवाडी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मच्छिंद्र गीते यांच्या नेतृत्वाखाली जय हनुमान ग्रामविकास पॅनल आहे. आज दिघोळ व माळेवाडी येथे प्रचाराचा नारळ फोडला यावेळी ते बोलत होते. यावेळी तुकाराम रंधवे, सुनील रंधवे, गहिनीनाथ गीते, माजी सरपंच लक्ष्मण माने, भगवान रंधवे, नवनाथ रंधवे, हरी आवारे, रामहारी आवारे, रंगनाथ आवारे, भीमराव तागड, बाळू दगडे, परमेश्वर विटकर, अशोक गीते.

आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी पुढच्या महिन्यात लिलाव होण्याची शक्यता

पॅनल मधील पुढील उमेदवार उभे आहेत 
प्रभाग एक अशोक आजीनाथ गीते, कोंताबाई गहिनीनाथ गीते, सुषमा रोहिदास गीते प्रभाग दोन भीमराव केरू विधाते, राणी नवनाथ आवारे,
तर यमुनाबाई सदाशिव रंधवे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. प्रभाग तीन आशाबाई भीमराव तागड, बळीराम बाबासाहेब तागड,
प्रभाग चार रोहित अनिल मोटे, संदिपान संगा राजगुरु.

Related Posts
1 of 1,292

      हे पण वाचा – बाळ बोठे विरोधात स्टँडिंग वॉरंट. बाळ बोठेच्यात अडचणीत  

यावेळी बोलताना गीते म्हणाले की, परिसरात मोठय़ा प्रमाणावर विकासकामे मार्गी लावली आहेत. सिमेंट रस्ते, बंधारे, पेव्हिंग ब्लाॅक तसेच दिघोळ मध्ये पाच रूपयांमध्ये अॅरो चे शुध्द वीस लीटर पाणी दिले जात आहे. तसेच मोफत दळण देण्याची योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. माळेवाडी प्रभागात आमचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. तसेच विकास कामामुळे आमचा पॅनलच्या सर्व च्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार आहेत. विरोधकांना सर्व जागेवर उमेदवार उभे करता आले नाहीत यातच त्यांचा पराभव निश्चित आहे.

       पत्रकार बाळ बोठे हा दिसेल तेथे त्याला पकडा जिल्ह्यातील २१ पोलीसठाण्याला आदेश 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: