वातावरण तापलं : आता धनगर समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर !

एकीकडे पूर्ण देशामध्ये आणि त्यातली त्यात राज्यात कोरोनाचा हाहाकार माजला आहे . अशातच सोशल डिस्टंगशिन्ग चे नियम पाळणे आणि गर्दी न करणे खूप महत्वाचे आहे. दुसरीकडे वेगवेगळे समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरत आहेत . मराठा समाजानंतर आता धनगर समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उताराला आहे , त्यामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे .
मराठा समाजानेही आरक्षणासाठी तीव्र आंदोलनाला सुरुवात केली आहे . याचेच पडसाद सोलापूर मध्ये एटीएम सेंटरवर दगडफेक झाल्याने उमटले. झालेली परिस्थिती पाहता लोकांचा सरकारवर किती राग आहे हे दिसून येत आहे.मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजाने आरक्षणासाठी मोर्चे काढण्याची तयारी केली आहे.
एवढंच काय तर धनगर समाजाच्या बैठकीत राज्य सरकारला गंभीर इशारा देण्यात आला आहे.संपूर्ण परिस्थिती पाहता राज्यात आरक्षणाचा मुद्दा आता पेटताना दिसत आहे त्यामुळे वातावरण चिघळले आहे.