वंचितांच्या लढ्यासाठी व्यापक संघटन उभारणार – योगेश थोरात

0 27

 श्रीगोंदा –  फुले, शाहू, आंबेडकर या पुरोगामी विचारांची लढाऊ संघटना म्हणून ओळखली जाणारी ऑल इंडिया पँथर सेना जिल्हा पदाधिकारी दिनांक ८ जानेवारी रोजी श्रीगोंद्यात संघटना बांधणी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी तालुका कार्यकारणी नियुक्ती करून, संघटनेच्या ध्येयधोरनांबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

समाजाच्या तळागाळातील वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित बांधवांसाठी सक्रिय असलेल्या ऑल इंडिया पँथर सेनेच्या माध्यमातून सामान्यांवर होणाऱ्या अत्याचाराला तात्काळ उत्तर देण्यात येणार असल्याचेही जिल्हा पदाधिकाऱ्यांनी येथे सांगितले. याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे बैठक पार पडली. (जिल्हाध्यक्ष) योगेश थोरात, (जिल्हा उपाध्यक्ष) अमर घोडके, (जिल्हा युवकाध्यक्ष) सागर भाऊ ठोकळ तसेच जिल्हा व तालुका कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
तालुका कार्यकारिणीचे श्रीगोंदा (तालुकाध्यक्ष) लखन शिंदे, (उपाध्यक्ष) पवन रणदिवे, (युवकाध्यक्ष) उत्तम पवार, (संघटक) गणेश जगताप, (उपसंघटक) अमोल हिवाळे, (शहराध्यक्ष) अक्षय आठवले या सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. जिल्हा उपाध्यक्ष अमर घोडके यांनी ऑल इंडिया पँथर सेनेच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यातील दलित, आदिवासी, भटके विमुक्त, मागासवर्गीय, शेतकरी, कष्टकरी, कामगार या दुर्बल घटकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारां प्रकरणी आवाज उठवण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच संघटना मजबूत करून न्यायिक भूमिकेत काम करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
Related Posts
1 of 1,292

राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनीटचे तातडीनं ऑडीट करा – अजित पवार 

जिल्हाध्यक्ष योगेश थोरात यांनी तालुक्यात संघटना बांधणी करून, सक्रिय कार्यकर्त्यांना संघटनेत सहभागी करण्याबाबत आवाहन केले. सामान्य माणसावर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात पँथर सेना आक्रमक भूमिकेत भविष्यात उतरेल अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी श्रीगोंदा पेडगाव रोडवर वाळू तस्करांनी भटक्याविमुक्त समाजाच्या महिलेचा विनयभंग करीत कुटुंबातील लोकांना जबरी मारहान केल्या प्रकरणी, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पीडित कुटंबासहित श्रीगोंद्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना भेटून, आरोपी बंटी कोथिंबीरे व त्याच्या इतर साथीदारांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: