लॉकडाउन असताना बालविवाह जोमात प्रशासन मात्र कोमात

0 34
 दादा सोनवणे /श्रीगोंदा 
 
श्रीगोंदा  ;-  जगभरात हाहाकार घातलेल्या करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने एकीकडे धुमधडाक्यात होणाऱ्या लग्नावर टाच येत असताना श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात बालविवाह झाल्याचे चित्र दिसत आहे मात्र याबाबत प्रशासन याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळेच हे सर्व बालविवाह झाल्याचे सर्व सामान्य नाग्रीकातून बोलले जात आहे त्यामुळे तालुक्यात बालविवाह जोमात तर प्रशासन मात्र कोमात होते असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
चीन देशातील वूहान या ठिकाणी जन्म घेतलेल्या कोरोना व्हायरसला प्रतिबंध घालण्यासाठी सरकारकडून अनेक प्रकारचे निर्बंध घालण्यात आले होते त्यातील एक म्हणजे या काळात विवाहावर बंदी घालण्यात आली होती तरीही श्रीगोंदा तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बालविवाह झाल्याचा धक्कादायक प्रकार प्रशासनाच्या डोळ्याआड झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले आहे बालविवाह रोखण्यासाठी मुलींचे वय १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच लावले जात असल्याची माहिती अहमदनगर चाइल्ड लाइनच्या १०९८ या क्रमांकावर देण्याचे आवाहन करण्यात येत असतानाही अनेक बालविवाह पार पडलेच कसे ? हा प्रश्न विनाउत्तरीतच राहिला आहे  लॉकडाउनच्या काळात आर्थिक, सामाजिक घडी विस्कटल्याने बालविवाहाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसू लागले आहे.
Related Posts
1 of 1,290

 हे पण पहा – रेखा जरे हत्याकांड प्रकरण । बाळ बोठेच्या स्टँडिंग अर्जावर बुधवारी होणार निर्णय

आजारांतील मृत्यूमुळेच नव्हे तर अशा पद्धतीनेही आयुष्य उद्ध्वस्त होऊ लागली आहेत. बालविवाहासारख्या घटना सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेने रोखल्या जात असल्या, तरी सरकारी यंत्रणा महामारी नियंत्रणात गुंतल्याने संकट गहिरे होऊ लागले आहे. याकडे तातडीने लक्ष न दिल्यास सामाजिक जीवनात राज्य आणि समाज पुन्हा मागे जाण्याची भीती निर्माण झाली आहे.त्यातच भर मुलांच्या शाळा बंद झाल्या, शिक्षण थांबले, रोजंदारीवर जाणारे पालक बेरोजगार झाले आणि त्याचा ग्रामीण भागातील कुटुंबांना फटका बसला. त्यामुळेच मुलींच्या जबाबदारीतून मोकळे होण्यासाठी बालविवाहाचा घाट घातला जात आहे. ग्रामीण भागात ऊस तोडणी कामगार, मजूर, गरीब शेतकरी यांच्यासाठी मुलींचे लग्न हे आव्हानच मानले जाते. समाजासोबत राहण्यासाठी रुढी-परंपरा, मानपान यांचे पालन करीत लग्न करायचे म्हणजे डोक्यावर कर्जाचा डोंगर असे चित्र अनेकदा पहायला मिळते. लॉकडाउनच्या काळात काही  कालावधी नंतर केवळ पन्नास लोकांच्या उपस्थितीत आणि घरच्या घरी लग्न करण्यास सरकारने मुभा दिली. अर्थातच नाईलाजानं का होईना, याला समाजमान्यताही मिळाली. हीच संधी समजून अनेक गरीब वधूपित्यांनी कायद्याच्या अज्ञानातून तर कुठे नाइलाजातून आपल्या मुली उजविण्यास सुरुवात केल्याचे आढ‌ळून येत आहेत.त्यातच अजूनही मोठ्या प्रमाणात बालविवाह होत असल्याचे चित्र नाकारता येत नाही मात्र याबाबत प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कारवाई केली जात नसल्याने टाळे बंदिमध्ये बालविवाह जोमात झाले मात्र प्रसाशन मात्र कोमात असल्याचे चित्र पाहण्यास मिळते आहे.
कमी खर्चाचे  कारण ?
मुलींचे लग्न हा आजही खर्चिक मुद्दा ठरत असल्याने लॉकडाउनमध्येच कमी पैशांत ते उरकण्याकडे पालकांचा कल दिसून येतो. लग्नसोहळ्याचा थाटमाट, जेवणावळी आणि इतर खर्चाने पालक कर्जबाजारी होतात. मात्र लॉकडाउनच्या काळात दोन लाखांचा खर्च २० हजारांवर आल्याने मुलींचे विवाह उरकून टाकण्याचा प्रयत्न होत आहे उच्चवर्णीयांमध्ये आजही सोयरीक करताना मुलीच्या वडिलांना पाच लाखांपर्यंत हुंड्याचा भार पेलावा लागतो. तीच कुटुंबे लॉकडाउनच्या काळात लाखभर हुंड्यावरही नाते जोडायला तयार झाल्याचे चित्र आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही .
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: