लवकरच मला नवी भूमिका पार पाडावी लागणार आहे – नान पटोले

0 14

नवी मुंबई – राज्यातील काँग्रेसमध्ये लवकरच मोठे बदल होण्याची चर्चा असून बाळासाहेब थोरात यांच्या जागी नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड होणार आहे आणि बाळासाहेब थोरात आपला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहे. अशी चर्चा मागच्या काही दिवसांपासून राज्यात होत आहे.

बाळासाहेब थोरात यांच्यावर एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या असल्याने त्यांच्यावरी भार कमी करण्याच्या उद्देशाने प्रदेशाध्यक्ष दुसऱ्या नेत्याकडे सोपवलं जात असल्याचं सांगितलं जात आहे.

तसे संकेत बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले होते. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीच्या चर्चेत नाना पटोले यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वीच त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातली महाविकास आघाडीत खळबळ माजली आहे.

Related Posts
1 of 1,322

प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी सांगितलं की, आमच्या पक्षात जे काही संघटनात्मक निर्णय घेण्याचे अधिकार आहेत ते राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आहेत. जी जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पार पाडून पक्ष बळकट करण्यासाठी आणि पक्ष स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्राला पुन्हा वैभव मिळवून देण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल

नाना पटोले पाडळे लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाड तालुक्यात आले होते. यावेळी त्यांनी लवकरच मला नवी भूमिका पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदावर असेपर्यंत नागरिकांची काही कामे तातडीने करणार आहे, असे सूचक वक्तव्य केलं होतं.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: