रोहीत्रासाठी स्वाभिमानीचे महावितरण कार्यालयात आंदोलन

0 37

जामखेड – तालुक्यातील मोहरी येथील क्षीरसागर वस्तीजवळ रोहीत्र द्यावे म्हणून स्वाभिमानी शेतकरी पक्षाने एक महिना भरापूर्वी निवेदन देऊनही महावितरण कंपनीने दखल न घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी महावितरण कंपनीच्या कार्यालयात आंदोलन केले. स्वाभिमानीचे नेते रवीकांत तुपकर यांनी उपअभियंता योगेश कासलीवाल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून चार दिवसात देण्याचे मान्य केले यामुळे सुरू असलेले स्वाभिमानीचे आंदोलन मागे घेण्यात आले. 


 मोहरी ( ता. जामखेड) येथे तब्बल ६ महिन्यापासून क्षीरसागर वस्ती येथे रोहीत्र नसल्याने शेतकरी त्रस्त झाले होते याबाबत शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीला सातत्याने पाठपुरावा करूनही मिळेना याबाबत शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे यांना सांगितले त्यानुसार स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या वतीने १० दिवसापूर्वी रोहीत्र द्या अन्यथा कार्यालयात आंदोलन करू असे निवेदन महावितरण कंपनीला देऊन महिना झाला तरी ठोस निर्णय न झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयात शुक्रवार रोजी दुपारी बाराच्या सुमारास आंदोलन  सुरू करण्यात आले. 

Related Posts
1 of 1,359


 स्वाभिमानीचे राज्याचे नेते  माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर यांनी वीज वितरण जामखेडचे उपअभियंता योगेश कासलीवाल यांना मोबाईल वरून संपर्क करून माहिती घेऊन त्वरित रोहीत्रचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सांगीतले. कार्यकारी अभियंता कासलीवाल  यांनी मंगळवारी रोहीत्र देण्याचे मान्य केल्यावर आंदोलन माघे घेण्यात आले.   यावेळी स्वाभिमानीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, माजी युवक तालुकाध्यक्ष ऋषीकेश डुचे, तालुका उपाध्यक्ष निलेश रंधवे, सरपंच युवराज हळनोर, नाना बारगजे, नितीन मेघडंबर, वैजिनाथ बारगजे, कैलास बारगजे, वैजिनाथ गीते, अमोल बारगजे, मारुती गीते, रावसाहेब ढेरे, रमेश इंगळे,युवराज इंगळे आदी सह शेतकरी उपस्थित हो

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: