DNA मराठी

रोहित पवार यांचा केंद्र सरकार वर हल्ला

0 156

कर्जत – कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय अत्यंत दुर्दैवी कर्जत -जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार याने केंद्र सरकारने घेतल्या कांदा निर्यातीबंदीनिर्णया विरुद्ध ट्विटकरून हल्लाबोल केला ते म्हणाले -आज लॉकडाऊन काळात संपूर्णअर्थव्यवस्था बंदअसताना शेतकऱ्याने कष्ट करून, मेहनत करून, शेतात राब राब राबत कृषि अर्थव्यवस्था सुरू ठेवली.

जनतेलाभाजीपाला तसेच कृषि उत्पादनांची कमतरता भासू दिली नाही, त्यामुळे आरोग्य यंत्रणा, पोलिस यंत्रणा यांच्याप्रमाणे शेतकरी देखील कोरोनायोद्धे आहेत. शेतकऱ्यांनी शेतात घाम गाळला नसता तर -२३ टक्केघसरलेली जीडीपी -३० टक्यांच्या खाली गेली असती, किमान याची तरीकेंद्र सरकारने जाण ठेवायला हवी.  पेट्रोल-डिझेलचे दर वाढले त्यामुळे दळणवळण खर्च वाढला आहे त्याचा परिणाम महागाईवर होताना दिसत आहे.

दिवसरात्र एक करून संपूर्ण कुटुंबासह शेतकरी शेतात राबतो, कष्ट करतो, उत्पादन घेतो. त्यांना इतके कष्ट घेऊन देखील योग्य मोबदला मिळत नाहिये, त्यांच्या हक्काचा पैसा हा इतर खर्चात जात आहे. त्यांना कष्टाचा योग्य मोबदला मिळावा. हा त्याचा अधिकार आहे, याचा केंद्र सरकारने विसर पडू देऊ नये. जेव्हा कधी कांद्याचे भाव पडतात, शेतकऱ्याचा कांदा अक्षरशा सडतो, फेकला जातो, तेव्हा मात्र निर्यात अनुदान वाढवून निर्यात वाढीसाठी केंद्र सरकार कधी प्रयत्न करत नाही आणि आज शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळतायत त्यात हरकत काय आहे? यावर्षी कांद्याचे चांगले उत्पादन होण्याचा अंदाज आहे, त्यामुळे कांद्याचे भाव आज जरी काही प्रमाणात वाढले असतील तरी या वाढलेल्या किमती कायम राहतील असे देखील नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना काही कालावधीसाठी जर चांगले दर मिळतअसतील तर केंद्र सरकारने यात आडकाठी आणू नये.

Related Posts
1 of 2,492


सामान्य जनतेला महागाईचा फटका बसायला नको या मताचा मी देखील आहे, पण यासाठी शेतकऱ्याचा बळी देणे चुकीचे ठरेल. आज  पेट्रोल डीजेल वर केंद्राने वाढवलेल्या करांमुळे पेट्रोल डीजेलच्या किंमतींमध्ये ऐतिहासिक अशी वाढ झाली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल डीजेल वरील करांमध्ये थोडी जरी कपात केली तरी वाहतूक खर्च कमी होऊन व्यापारी वर्गासह सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो,याबाबतीत केंद्र सरकारने विचार करायला हवा. 

 भारतातील ग्रामीण भागाची विशेषता शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढवल्याशिवाय भारतीय अर्थव्यवस्था उभारी घेऊ शकणार नाही, यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे गरजेचे असल्याबाबत जागतिक नाणेनिधीने देखील वेळोवेळी सांगितले आहे. आज आपण कांदा निर्यात बंदी केली तर पाकिस्तानची कांदा निर्यात वाढेल, याचा फायदा पाकिस्तानमधील कांदा उत्पादकांना होणार आहे, याचा देखील केंद्र सरकारने विचार करायला हवा. यामुळे निर्यात न थांबवता, निर्यातीला अशी विनंती सुध्दा केंद्र सरकारला त्यानी केली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: