रेनहार्ड गेंजेल, रॉजर पेनरोज आणि एन्ड्रिया गेज यांना या वर्षीचा भौतिकशास्त्राचे नोबेल

0 46

स्टॉकहोम-  २०२० चा भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार हा यंदा तीन शास्त्रज्ञांना विभागून देण्यात आला आहे. रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल आणि एन्ड्रिया गेज या तीन शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्रातलं नोबेल देऊन गौरवण्यात आलं आहे. या तिघांनाही ११ लाख डॉलर्सच्या रकमेसह सुवर्णपदक दिलं जाणार आहे. स्वीडनच्या स्टॉकहोम येथून आज या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.


ब्लॅक होल फॉर्मेशनला भौतिकशास्त्राच्या जनरल थिअरी ऑफ रिलेटीविटीशी जोडण्याचं काम रॉजर पेनरोज यांनी केलं. तर रेनहार्ड आणि एन्ड्रिया या दोघांनी आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेलं अतिविशाल कृष्णविवर अर्थात ब्लॅक होल शोधून काढलं. त्यांचं हे काम अंतराळ संशोधनात अतिशय मोलाचं आहे त्यामुळेच त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

Related Posts
1 of 1,357


तर वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार (२०२०) हार्वे जे. अल्टर, मायकल ह्यूटन आणि चार्ल्स एम. राईस यांना जाहीर झाला आहे. या तिघांना ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूच्या शोधासाठी या प्रतिष्ठेच्या पुरस्कारानं गौरविण्यात येणार आहे. नोबेल पुरस्कार समितीने याची घोषणा काल केली होती.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: