रेडेवाडी फाटयावर कावळ्याचा मृत्यू बर्ड फ्ल्यू ने प्रयोग शाळेचा अहवाल

0 22

जामखेड –  जामखेड – बीड रोडवरील रेडेवाडी फाट्याजवळ दि. १२ रोजी कावळा आणि कोकीळ पक्षी मृत सापडले होतेे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी त्या दोन्ही पक्षाचे स्वॅॅॅब तपाासणी साठी पुणे येथे प्रयोगशाळेत पाठवले होते त्यापैकी कावळ्याचा अहवाल बर्ड फ्ल्यू पॉझिटिव्ह आला असल्याचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी सांगितले. यामुळे तालुक्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याने तालुुक्या खळबळ उडाली आहे. याबाबत प्रशासनाने सावधगिरीचा इशाारा दिला आहे.

दि. १२ रोजी जामखेड पासून चार कि. मी. अंतरावर रेडेवाडी फाट्यापासून १०० फुट अंतरावर एक कावळा व कोकीळा यांचा तडफडून मृत्यू झाल्याची माहिती नितीन डोंगरे यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिली त्यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ वनपरिमंडळ अधिकारी अनिल खराडे यांना दूरध्वनीद्वारे सांगितले. तेथे त्यांनी वनमजूर शामराव डोंगरे यांना पाठवले.

प्रत्यक्षदर्शी दासा रोडे यांनी सांगितले की कावळा, कोकीळा यांना तडफडत असताना पाहिले आहे व दोन-तीन लहान पक्षी अजून मरून पडले आहेत अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय गवारे यांना संपर्क साधण्यात आला त्यांनी कावळ्याचे स्वँब घेऊन पुण्याला प्रयोग शाळेत पाठवण्यात आले.

शनिवारी सकाळी सदर मृत कावळ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला यामुळे तालुक्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला आहे. तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर कूक्कटपालन शेड आहे त्या सर्व ठिकाणी दक्षता म्हणून कुक्कुटपालन चालकांनी कोंबड्यांना लस टोचून घेतली आहे.

Related Posts
1 of 1,292

शहरातील मिलिंदनगर मध्ये एक पक्षी दिसून आला आहे त्याला उडता येत नाही. तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकारी एकच आहे यांच्याकडे मनुष्यबळ नाही त्यामुळे बर्ड फ्लू सारख्या संकटाला सामोरे जाण्यासाठी नवीन टिम मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

डाॅ. अरूण गवारे पशुवैद्यकीय अधिकारी एक कावळ्याचा मृत्यू झाला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यामुळे शहराच्या आसपास चार ते पाच कुक्कुटपालन केंद्र आहे तेथे भेट दिली पक्षी चांगले आहेत पण सावधगिरी म्हणून तेथील पक्षाचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठवले आहेत या सर्व ठिकाणी निर्जंतुक करण करण्यास सांगितले आहे. नान्नज व अरणगाव येथे पशुवैद्यकीय अधिकारी आहे जामखेड येथे रिक्त जागा आहे व मनुष्यबळ कमी आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: