DNA मराठी

रुग्णांची लूट ; खाजगी  रुग्णालयांना नोटीस १ लाखापेक्षा अधिक बिले 

1 189

अहमदनगर : कोविद सत्र  चालूच असताना रुग्णांची संख्या वाढतीये आणि कोविद सेंटर्स कमी पडतायेत . खाजगी रुग्णालये तर रुग्णांकडून मुबलक प्रमाणात खर्च आकारात आहेत आणि हि बाब जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या लक्षात येताच  १ लाखापेक्षा अधिक  बिल आकारला जात असेल तर त्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत . यामध्ये रुग्णांना फक्त बाई=रा होयचंय आणि त्यासाठी अनाठायी लयलूट रुग्णांची केली जातीये .

Related Posts
1 of 2,492

जे खाजगी  कोविड सेंटर्स उगीचच खर्च आकारात आहेत त्यांच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून उपजिल्हाधिकारी पल्लवी  निर्मळ  यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरात तपासणी पथके नियुक्त करण्यात आली  असून आहेत . हि पथके  कोविड सेंटर्स  ची चौकशी करत आहेत त्यांच्या माहितीनुसार  १ लाखापेक्षा जास्त रकमेची १३३ बिले प्राप्त झाली असून त्यापैकी ९६ बिले तपासण्यात अली आहेत . ६८ बिलामध्ये त्रुटी आढळल्या असून १ लाखापेक्षा अधिक रक्कम विनाकारण आकारण्यात  आली  आहे त्यामुळे अशा  १३ खाजगी रुग्णालयांकडून ११ लाख ५३ हजार १२० रुपयांची वसुली करण्यात आलीये .

विविध खाजगी रुग्णालयांपैकी विघ्णहर्ता हॉस्पिटल आणि पतियाळा हाऊस  मधील अहमदनगर कोविड  सेंटर या खाजगी कोविड  सेंटरमधून आत्तापर्यंत एकही बिल सादर केले नसल्यामुळे जिल्हा प्रशासनाने या हॉस्पिटलला नोटिसा  बजावल्या आहेत . महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी अनिल बोरगे   यांच्याकडे ४६ बिलांच्या तपासणीचे काम चालू आहे . चार हॉस्पिटल मधील २७ बिलापैकी १३  बिलांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत . संबंधित रुग्णालयांना नोटीस पाठवल्या असून त्यांच्याकडे अद्याप येणे बाकी असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी  पल्लवी  निर्मळ यांनी दिलीं  . 

Show Comments (1)
error: Content is protected !!
%d bloggers like this: