देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशातच काही हॉस्पिलमधून रुग्णांची लूटमार होत आहे.या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत या प्रकाराला आळा बसावा यासाठी रुग्णालयांनी आकारावयाच्या दरासंबंधी सूचना दिल्या आहेत . तसेच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनीदेखील लूटमार करणाऱ्या रुग्णालयांना इशारा दिला आहे.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी इशारा देत म्हटले की- कुठल्याही रुग्णालयाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जादा दर आकारू नये.तसे आढळ्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल.
कोरोना पासून बचावासाठी राबवण्यात येणाऱ्या ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ मोहिमे अंतर्गत करोनाचे निदान होवून वेळेत उपचार करणे सुलभ होणार असल्याने ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवा, असे निर्देशही त्यांनी अजित पवारांनी दिले.या मोहिमे अंतर्गत घरोघरी जावून प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी होणार आहे. या मोहिमेमुळे ,कोरोना झाला असेल तर वेळेपूर्वीच उपचार मिळतील आणि रुग्ण लवकर बरा होईल.