रियाच्या जामीन वर आज होणार सुनावणी

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातून समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात एनसीबीने अटक केलेल्या आरोपी रिया चक्रवर्ती आणि त्याचा भाऊ शोविक चक्रवतीच्या जामीनावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
रियाच्या जामीनावर २३ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती. मात्र,ही सुनावणी मुंबईमध्ये झालेल्या पाउसा मुळे पुढे ढकलण्यात आली होती. या मुळे ही सुनावणी आज होणार आहे अशी माहिती रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी दिली. या पूर्वी रियाने दोन वेळा जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र तो फेटाळून लावण्यात आला होता. तसंच तिच्या न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली होती.
तसंच एनसीबी करत असलेल्या तपासामध्ये बॉलिवूड ड्रग्स प्रकरणसमोर आलं असून यात अभिनेत्री दीपिका पदुकोण तसेच आणखी मोठ्या अभिनेत्रींच्या नाव समोर आलं आहे. त्यामुळे दीपिकाला चौकशीसाठी समन्स जारी केले असून ती गोव्याहून मुंबईकडे रवाना झाली आहे.