रियाची झाडाझडती ; प्रश्नांचा भडीमार ; अंकिताचं रियाला उत्तर


मुंबई : सुशांतसिंग आत्महत्त्या प्रकरणात रिया सीबीआय च्या जाळ्यात असून तब्बल दहा तास कसून चौकशी करण्यात आली . पण रियाकडून म्हणावी तशी क्लीनचित सीबीआय ला भेटली नाही . ८ जूनला नेमका काय घडलं ? बँक डिटेल्स ? टूर्स ? ड्रग कनेक्शन ? अशा प्रश्नांची सरबत्ती रियावर लावण्यात आली . सुशांतच्या मित्र सिद्धार्थ पिठानी याचीही सलग सातव्या दिवशी सीबीआय मार्फत चौकशी करण्यात आली . रियाचा भाऊ शोईकचीही चौकशी करण्यात आली . सिद्धार्थला माझ्याविरुद्ध जबाब देण्यासाठी सुशांतच्या फॅमिलीकडून दबाव दिला जातोय हेही रियाने सांगितले त्याचबरोबर रियाने सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकितावर केलेल्या टीकेलाही सडेतोड उत्तर सोशल मीडियाद्वारे अंकिताने दिले, सुशांत माझ्या सोबत होता तोपर्यंत कुठलाही मानसिक त्रास त्याला नव्हता यापूर्वीही मी सुशांतच्या कुटुंबियांसोबत होते आणि यापुढेही राहणार . ड्रग डीलर गौरव आर्याला ईडीचे चौकशी समन्स गेलेले असून ३१ ऑगस्ट पर्यंत हजार राहावे लागणार ची नोटीस गोव्याच्या हॉटेल बाहेर लावण्यात आली आहे .