रिपब्लिक टीव्हीच्या प्रवर्तक आणि संचालकांना लवकरच समन्स बजावले जाईल –   मुंबई पोलीस 

0 40

मुंबई – मुंबई पोलिसांनी  आज मोठा TRP घोटाळा समोर आणला आहे . या घोटाळ्यामध्ये तीन टीव्ही चॅनल्सचे नाव समोर येत आहे. त्या ३ पैकी अर्णब गोस्वामीच्या ‘रिपब्लिक टीव्ही’ या वृत्तवाहिनीचेही यात नाव आले आहे. या टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्ही आणि  फक्त मराठी, बॉक्स सिनेमा  या दोन टीव्ही चॅनल्सचा सहभाग आढळल्याने त्यांचा तपास सुरु आहे असे मुंबईच पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आज सांगितले.

रिपब्लिक टीव्हीच्या प्रवर्तक आणि संचालकांना लवकरच समन्स बजावले जाईल असे त्यांनी सांगितले. या रॅकेटबद्दल सविस्तर माहिती देताना परमबीर सिंह म्हणाले की, ‘हंसा’ नावाची संस्था टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी या चॅनल्सना मदत करत होती. मुंबईत जवळपास दोन हजार बॅरोमीटर बसवण्यात आले होते.

Related Posts
1 of 1,371

टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला  असे सिंह यांनी सांगितले. या चॅनलच्यावतीने दर महिन्याला काही जण वेगवेगळया घरांमध्ये जायचे आणि पैसे द्यायचे. लोकांना ही चॅनल्स लावायला सांगितले जायचे अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: