DNA मराठी

राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे एका तरुणाने पहाटे तरुणीच्या घरी जाऊन केला हे प्रकार …

0 192

राहुरी – राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या परिसरात एका तरुणाने त्याच्या परिसरात राहणाऱ्या एका तरुणीच्या घरी जाऊन तिला गोळ्या झाडून मारण्याचा प्रयत्न केला. तसेच स्वतःला पण गोळ्या घालून जखमी केला आहे.  ही  घटना आज सकाळी पहाटेच्या सुमारास घडली आहे.

मिळाल्या माहिती नुसार आज पहाटेच्या सुमारास विक्रम रमेश मुसमाडे वय (३०) हे तरुण घरच्या मागच्या बाजूने तरूणीच्या घरात दाखल झाला आणि त्या तरुणीला विचारले कि तू माझ्या वर प्रेम करते का ? त्या तरुणीने आपला तुझ्या वर काही प्रेम नाही आहे असे सांगितले तेव्हा विक्रमने आपल्या जवळील बंदुकीने त्या तरुणीवर गोळी झाडली.

परंतु ती गोळी तरुणाच्या डोक्याजवळून गेल्याने ती जास्त जखमी झाली नाही. मात्र हे पाहून विक्रमने आपल्या डोक्याला बंदूक लावून गोळी झाडली आणि गंभीर अवस्थेमध्ये जखमी झाला त्याला तात्काळ हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले मात्र  हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु असताना विक्रमचा मुत्यू झाला.

या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी राहुरी पोलिसांनी धाव घेतली तर फॉरेन्सिक लँबचे पथक ,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी देखील घटनास्थळी भेट देत पुढील तपासाची चक्रे फिरवली आहे.या प्रकरणामुळे पूर्ण राहुरीतालुक्यात फक्त हीच चर्चा सुरु आहे कि विक्रम ने हे का केला ?

Related Posts
1 of 2,489

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: