
नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील अत्याचार घटनेविरुद्ध पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हाथरस इथे काल गुरूवारी जात असताना त्यांची उतर प्रदेश पोलिसा सबोत धक्काबुक्की झाली होती.
या प्रकरणात आता राहुल गांधींसह तब्बल दोनशे जणांविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळी उशिरा ग्रेटर नोएडा इथे पोलिसांनी काँग्रेसच्या २०० नेत्यांविरोधात FIR दाखल केला.
कलम १४४ चं उल्लंघनचा कारण देत राहुल गांधी आणि प्रियांका गांधींसह काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. या आधी काँग्रेसच्या नेत्यांना हाथरस इथे पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यापासून रोखण्यात आलं होतं.