राहुल गांधी तोंडावर आपटणार , ‘या’ प्रकरणावरून निलेश राणेंची टीका !

0 40

केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याला अनेक राजकीय पक्षांचा विरोध आहे. या वरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.याच मुद्द्यावरून भाजपचा सर्वात जुना मित्र पक्ष असलेल्या अकाली दलाने सत्ता सोडली आणि काँग्रेस आक्रमक झाली. कृषी कायद्यावरून राहुल गांधी यांनी सरकारवर सडकून टीकादेखील केली. आता याच कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

सध्या कृषी कायद्याविरोधात जनमत संघटित करण्यासाठी राहुल गांधी पंजाबमध्ये आहेत. त्याठिकाणी झालेल्या सभेतून शेतकरी गायब असल्याचं चित्र आहे असे वृत्त पसरले. आणि तोच मुद्दा पकडून नीलेश राणे यांनी राहुल गांधींवर टीका केली .

Related Posts
1 of 257

नीलेश राणे यांनी ट्विट करत म्हटले -राफेल प्रमाणेच राहुल गांधी हे शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार आहेत. कृषी बिलाची चर्चा सभागृहात होत असताना राहुल गांधी परदेशात होते. शेतकऱ्यांना त्यांचं हित बरोबर कळतं.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: