राहुल गांधी तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घराच्या बाहेर काढून दाखवा – निलेश राणे

0 43

मुंबई- कुरुक्षेत्रा मध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी भारत-चीन सीमा वादावरून मोदी सरकारवर काल जोरदार हल्ला चढवला होता. राहुल गांधींनी हरियाणामध्ये बोलताना म्हटले होते की, पंतप्रधान स्वत:ला देशभक्त म्हणवतात, मात्र संपूर्ण देशाला माहिती आहे की चीनचं सैन्य भारतात शिरलं आहे. मग हे असे कसले देशभक्त आहेत? मी सांगतो की आमचं (काँग्रेस) सरकार असतं तर चीनला देशाबाहेर काढायला १५ मिनिटही लागले नसते.

भारतीय सैन्याने चीनी सैन्याला १००किमी दूर केलं असतं या विधानावरून आता निलेश राणे यांनी राहुल गांधींवर ट्विट करून निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी ट्विट मध्ये सांगितले आहे की तुम्ही म्हणतात (राहूल गांधी) की जर तुमची सत्ता असली असती तर तुम्ही चीनला पंधरा मिनिटात बाहेर काढले असते.

तुम्ही चीनला राहू द्या तुमची महाराष्ट्रामध्ये सरकार आहे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घराच्या बाहेर काढून दाखवा असा टोला निलेश राणे यांनी ट्विट द्वारे राहुल गांधी यांना लावला आहे.आज राज्य मध्ये कोरोनाची परिस्थिती बिकट होत आहे. या मुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तूम्ही घराचे बाहेर काढा आणि कोरोना परिस्थिती हाताळण्यात सांगा असा सुद्धा निलेश राणे यांनी आपल्या ट्विट मध्ये सांगितले आहे.

कोरोना काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराचे बाहेर निघत नाही यावरून भारतीय जनता पक्षाचेकाही नेते उद्धव ठाकरे यांच्या वर निशाणा साधत आहे.

Related Posts
1 of 1,402Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: