राहुल गांधीच्या अटकेनंतर शरद पवार यांनी दिली आपली प्रतिक्रिया…

0 123

मुंबई – काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना काल गुरुवारी उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. राहुल गांधी यांना कलम १८८ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.


अटक होण्यापूर्वी राहुल गांधी हथरसला पायी चालत  जात होते त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर या घटनेवर भारतासह राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत तसेच अनेक नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Related Posts
1 of 2,047

या घटनेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील ट्विटरद्वारे निषेध करत संताप व्यक्त केला आहे. शरद पवारांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींसोबत केलेले वर्तन हे अत्यंत निंदनीय आहे.अशा पद्धतीने लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत आणि कायदा हातात घेतला जातोय. अशा शब्दात त्यांनी काल झालेल्या घटनेचा निषेध केलाय.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: