राहुल गांधींना धक्काबुक्की ;संजय राऊत संतापले !

0 63

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली तसेच त्यांची कॉलर पकडून जमिनीवर पाडलं गेलं. या संतापजनक प्रकारचा संजय राऊत यांनी निषेध केला आहे.संजय राऊत म्हणाले -हे चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला आणि राजकारणाला शोभा देणारं नाही ,तसेच हा याप्रकारे म्हणजे देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा सामूहिक बलात्कार !असे म्हणत राऊत यांनी संताप व्यक्त केला.

Related Posts
1 of 549

संजय राऊत पुढे म्हणाले की ,राहुल गांधी खासदार आहेत,सोबतच माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे नातू आणि राजीव गांधींचे पुत्र आहेत. या दोघांनीही देशासाठी बलिदान दिलं आहे. रक्त सांडलं आहे. याचा विसर जर कोणाला पडला असेल तर इतिहास त्यांना माफ करणार नाही.

तसेच एका मुलीवर बलात्कार झाला, खून झाला त्याबद्दल आवाज उठवायचा नाही? ही कुठली लोकशाही?असा खोचक आणि संतापजनक सवालदेखील राहुल गांधी यांनी विचारला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: